जन्मजन्मांतरात मानव जन्म चांगला
मानवजन्मात अभियंता हाच पहिला
कार्यारंभी जसे वंदीतो श्री गणेशाला कार्यारंभाची मुहूर्तमेढ करतो अभियंता पहिला॥१॥
अवकाशातून विमानाची सफर
सागरी बोटीतून जलविहार
गावोगावी शहर ते नगर
रस्त्यांचे नियोजन सभोवार ॥२॥
संगणकाचे तंत्र असो दुरध्वनीचा मंत्र
आकाशवाणी, दुरचित्रवाणी, हत्यारे, संयंत्रे,
अणूतंत्र असो वा असो तंत्र वा यंत्र
अभियंत्यांनीच दाखविला मुल मंत्र ॥३॥
आभाळास गवसणी, गाठला सागराचा तळ वाढविले मनुष्यबळ, दाबता यंत्राची कळ
बंदरे, धरणे, रस्ते, विजेचे प्रकल्प सकळ
अणू रेणूचा खेळ हे अभियंत्यांचे बळ ॥४॥
असो कुठेहि हिम प्रभात वा कडापात
अभियंते पोहचती तिथे फक्त क्षणार्धात
असो सीमेवरचे शत्रूचे रणकंदण
बनवती पूल ते हातोहात रातोरात ॥५॥
भुयारी मार्ग असो, उड्डाण पूल वर
डोंगर छेदूनी आरपार
वळणे घाटाची केली सूकर
द्रूतगती मार्ग पोहचवती सत्वर ॥६॥
निसर्गकोप असो वा परचक्राचा उपदव्याप् अभियंत्यांचा प्रताप कमी करे पंचमहाभूताचा संताप
असो मोठा भुकंप वा वरूणदेवतेचा कोप
प्रसंगी जलप्रलय, कष्टती अभियंते बिनाझोप ॥७וו
महाकाय नद्यावरती, धरणे महान
ओढ्या नाल्यावरती, बंधारे लहान
पाझर तलाव कुठे, कितीतरी गावतळे
भिजली जमीन, पिकले शेतमळे ॥८॥
अन्न, वस्त्र आणि निवारा
अभियंत्यांचा मूलभूत पाया सारा
ग्रामविकास असो वा नगरविकास
अभियंत्यांचा सदोदीत एकच ध्यास ॥९॥
उंच उंच इमारती, शाळा, बंगले
नयनमोहन बगिचे, कारंजे, फुले
दुचाकी, चारचाकी, नाना वाहने पळे
रेल्वे, बोटी, यारी, केली यंत्र भले भले ॥१०॥
कालवे, शेतचाऱ्या असो पाण्याचे व्यवस्थापन
महापूर नियंत्रण, वा बांधकाम नियोजन
भूमिगत उत्खनन असो वा विविध संशोधन
आकाशातील अवलोकन अभियंता करे नियंत्रण ॥११॥
अखिल मानवजातीचे कल्याण, देशाचा मान
सतीचे हे वाण, याची अभियंत्यांना जाण
कार्य हे महान, करूनी जीवाचे रान
जय अभियंता, तव गौरवाचा प्रयत्न लहान ॥१२।
इंजि.राजहंस किसनराव देसाई
पाटबंधारे विभाग अभियंता अहिल्यानगर
