श्रीरामपूर दिपक कदम ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणारे आणि भारत सरकारकडून शौर्यपदक प्राप्त करणारे श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा भव्य सत्कार सर्व जाती-धर्मांच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत करण्यात आला.हा आगळावेगळा सत्कार शासकीय विश्रामगृह, श्रीरामपूर येथे सायंकाळी ५ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष कवी सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या पुढाकाराने पार पडला.
या कार्यक्रमात शीख,बौद्ध,हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ब्रह्मकुमारी,महानुभाव आदी धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक धर्मगुरू उपस्थित होते.शीख धर्मगुरू आलोक सिंग मस्किन, बौद्ध धर्मगुरू भंते मोगलयान, हिंदू धर्मगुरू प्रभू दयाल शर्मा, मुस्लिम धर्मगुरू अकबरअली काझी,ख्रिश्चन धर्मगुरू रेव्ह. फादर संजय थोरात, ब्रह्मकुमारी बी.के.मंदादीदी,महानुभावपंथ धर्मगुरू हंसराज पंजाबी बाबा, जयेशमनी पंजाबी ह. भ. प. तुकाराम महाराज कदम, ह.भ. प.संतोष महाराज पटारे, बौद्धाचार्य अण्णासाहेब झीने, आणि अण्णासाहेब शरणांगते यांच्या हस्ते देवेंद्र औताडे यांचा सत्कार करण्यात आला.सर्व धर्मगुरूंनी त्यांना आशीर्वाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी उपस्थित असलेल्या विंग कमांडर देवेंद्र औताडे म्हणाले, "माझे अनेक सत्कार झाले,पुढे होतील ही पण हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. सर्व धर्मगुरूंनी दिलेला आशीर्वाद आणि प्रेम मला प्रेरणा देणारे आहे.आमचा खरा दुश्मन कोणत्याही जाती-धर्माचा नाही, तर जो कोणी भारताकडे वाईट नजरेने पाहील – मग तो पाकिस्तान असो,चीन असो, की अन्य देश अशा शत्रूंचा खात्मा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत."हा सत्कार आगळावेगळा असून संयोजक सुभाष त्रिभुवन गौतम उपाध्ये यांना मी मनापासून धन्यवाद देतो तसेच शूरवीर विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा सत्कार सर्व धर्मगुरूच्या वतीने केल्याने त्रिभुवन यांचे सर्व धर्मगुरूंनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे संयोजक कवी सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले, "ऑपरेशन सिंदूर कडे संपूर्ण जगाचे लक्ष होते.विंग कमांडर औताडे यांनी शत्रूच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी सारख्या छोट्या खेड्यातून आलेला हा वीर आमचा फक्त माळेवाडी श्रीरामपूर तालुक्याचा अभिमान नव्हे संपूर्ण भारत देशाचा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अभिमान आहे."
त्यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक मुक्तार शहा, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, परशुराम आदिक,आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी दिलीप औताडे, तसेच कवी बाबासाहेब पवार, राहुल शहाणे, बिट्टूशेठ बत्रा, शाहरुख मन्सुरी, वणेश कुवर, सुनील दंडवते, प्रभाकर गायकवाड,अमोल मिसाळ, नंदकिशोर लबडे, शरीफ शेख, असिफ मणियार, वैशाली पालकर शाहिद बागवान, रितेश पालकर,तय्यब पठाण, विशाल थोरात, अल्ताफ अत्तार, कृष्णा शर्मा,शाहरुख बागवान, अक्षय छाजेड,जुबेर कुरेशी आदींची उपस्थिती होती.
