अहिल्यानगर,श्रीरामपूरात गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्रेत्याविरोधात कारवाई

Cityline Media
0
स्थानिक गुन्हे शाखेने १,८१,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त.

अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले असताना अहिल्यानगर आणि श्रीरामपूर येथील गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्रेत्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई केली आहे.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दिपक मेढे,पोलीस अंमलदार सुनिल पवार,शाहिद शेख,सतिष भवर,आकाश काळे यांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

अहिल्यानगर शहरामध्ये व श्रीरामपुर या ठिकाणी जात माहिती घेत गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणाची मिळालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम आरोपींचे नांव पत्ता जप्त मुद्देमाल

१ )श्रीरामपुर शहर ८८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २७१, २२३, महा.पशुसंरक्षण अधिनियम क. ५(क), ९ (अ) १) जुबेर आयुब कुरेशी२) वसीम इसाक कुरेशी, दोन्ही रा. वार्ड नं. २ श्रीरामपुर
३) मुस्ताक कुरेशी (पुर्ण नांव पत्ता माहित नाही)

१,६०,३०० रुपये कि. चे ८०० किलो गोमांस व लोखंडी सुरा २( तोफखाना ९६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २७१, २२३, महा.पशुसंरक्षण अधिनियम क. ५(ब)(क),९ प्रमाणे १) फेरोज शमशेर शेख रा. घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर २१,२००रुपये कि. चे १०० किलो गोमांस,लोखंडी वजनी काटा, कोयता
एकुण ०२०४ १ ,८१,५००

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!