नेवासा प्नतिनिधी तालुक्यातील सोनई येथे आझाद समाज पार्टी युवा जिल्हाध्यक्ष विश्वदिप वाघमारे यांनी भिमसैनिकांची नुकतीच भेट घेतली असून
प्रसंगी सोनई शाखा स्थापन करण्याबाबत तसेच सोनई परिसरातील बौध्द समाजाच्या अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट आझाद समाज पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात आझाद समाज पार्टी शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आझाद समाज पार्टी अहिल्यानगर जिल्ह्यात चंद्रशेखर आझाद याच्या संघटनेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर व काशिराम यांचे कोणतेही सामाजिक राजकीय धार्मिक कार्य करायचे असेल तर निर्व्यसनी राहावे लागेल असा संकल्प भंते करुणानंद यांचेकडुन पंचशील घेऊन करण्यात आला.
