नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील ५३ कर्मचारी वर्गाकडून मोफत स्पोर्टस् गणवेशचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक चिंतामण गावित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या
प्रतिमा पूजनाने झाली.मान्यवरांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले.शाळेतील कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक डॉ.रमेश गावित यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते नवसू गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर माजी विद्यार्थी लक्ष्मण चौधरी, परसराम चौधरी, पांडुरंग गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. गोपाळ
गायकवाड, रमेश चौधरी, वसंत गावित, तुळशीराम गावित, शालेय समितीचे सदस्य नीलेश पाडवी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक पवार यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन चिंतामण गावित यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद, कर्मचारी, महिला बचतगट, महिला आदींनी परिश्रम घेतले.
