श्रीरामपूर दिपक कदम-येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डि पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये नुकताच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशासक फादर फ्रँको यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर शिक्षक दिनाचे महत्त्व विषद केले.विद्यालयाच्या प्राचार्या सिस्टर ब्लेसा यांनीही शैक्षणिक मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांमधून मिसबा शेख,सृष्टी देठे यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान एलकेजी ते नववीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करणारे विचार व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच यावेळी इ.दहावीतील विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासनाचे कामकाज पाहिले.दरम्यान इ.नववीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू दिली. प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका अनिता बोधक, अनिता पवार,नंदा पवार, पुजा थोरात,शंकर बाहुले यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो, प्रशासक फा.फ्रँको,प्राचार्या सिस्टर ब्लेसा,समन्वयक सि. रेन्नी,सचिव मॉली कुथूर,वरिष्ठ लिपीक रवी लोंढे,गणेश पवार,विकास वाघमारे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ देशमुख,सूत्रसंचालन श्रावणी बोळगीर,प्राची मेहेरखांब यांनी केले,तर आभार प्रेम शेवते याने मानले.
