अनंत चतुर्दशीला विहिंप बजरंग दलाचे सुरक्षित विसर्जनाचे सेवा कार्य

Cityline Media
0
संगमनेर विशाल वाकचौरे १९६४ साली जन्माष्टमीच्या पावन पर्वावर विश्व हिंदू परिषदेचे सेवा, संस्कार,सुरक्षा आणि संघटन या तत्त्वांवर या संघटनेची स्थापना झाली.
यावर्षी विश्व हिंदू परिषदेच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे वर्ष सुरू आहे. यातील पहिले सेवा कार्य म्हणून सुरक्षित विसर्जनाचा ध्यास संघटनेने घेऊन श्रीगणेशाचे विधिपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जन करणार आहे.

संगमनेर येथील प्रवरानदी पहिला घाट,महादेव घाट तसेच गंगामाई घाट येथे बजरंग दलाने बनविलेल्या तराफा बोटींच्या साहाय्याने अनंत चतुर्थी, शनिवार, दि.६ सप्टेंबर रोजी सकाळी ८:०० वाजेपासून विहिंप बजरंग दल,मातृशक्ती- दुर्गावाहिनीकडून श्रीगणेशाचे विधिपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जन करणार आहे.

दरवर्षी पाण्यात बुडून २-३ जणांचा विसर्जन करतांना मृत्यू होतो,त्यामुळे बजरंग दलाने १० वर्षांपासून लाईफ जॅकेटसह तराफा बोटींच्या साहाय्याने सुरक्षित विसर्जनाचा ध्यास घेतला,त्याला दरवर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. 

संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी व विहिंप बजरंग दल, मातृशक्ती- दुर्गावाहिनी पदाधिकारी यांची दि.२ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. यात सूक्ष्म नियोजन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!