भाद्रपद कृष्ण पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत पितृ पंधरवडा प्रारंभ
नाशिक दिनकर गायकवाड हिंदू धर्म संस्कृतीनुसार भाद्रपद कृष्ण १ पौर्णिमेपासून म्हणजेच दिनांक ७ सप्टेंबर पासून पितृ पंधरवाड्यास सुरुवात झाली आहे.तर २१ सप्टेंबरलाही ग्रहणच असल्याने पितृपक्ष सुरू आणि शेवट ग्रहणाने होणार आहे.आहे. भाद्रपद कृष्ण पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत हा पंधरवडा पाळला जातो. आदिवासी बांधवांमध्ये सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांना त्रास किंवा अडचणी होऊ नये यासाठी भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत धर्म शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पितृपंधरवडा पाळला जात असतो ८४ लक्ष योनी पूर्ण केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो असे शास्त्रात सांगितले आहे.
मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तो संसारात राहत असतांना विविध समस्यांना सामोरे जात असतो ब आपली जीवन नौका सुरक्षित पार पाडण्यासाठी धमनि दाखवून दिलेल्या मागनि मार्गक्रमण करीत असता मनुष्याच्या मृत्यूसमयी तो ज्या तिथीस मरण पावला त्या तिथीला पित्राचे पूजन स्मरण करून ब्रम्हभोजन घातल्यास पित्र तृप्म होतात असे शास्त्रात सांगितले आहे.
शास्त्र आधाराने सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हापासून ते सूर्य तुळ राशी पर्यंत राहत
असल्याने या दोन महिन्यांच्या कालावधीत पितृ पक्ष पाळला जातो. परंतु प्रतिपदा ते अमावस्या या कालावधीत तर्पण' दिल्यास पित्रमुक्त होतात असा शास्त्राधार असल्याचे वासुदेवशास्त्री जोशी यांनी सांगितले.
भागवत कथेत गरुड पुराणात तसेच अनेक धार्मिक ग्रंथात याचा उल्लेख आहे. नित्यकर्माचे श्राद्ध घरीच केले जाते. यात स्नानसंध्या, पूजा, ब्रह्मयज्ञ, तर्पण हे सर्व नित्य कर्मामध्ये शास्त्राने सांगितले आहे. त्यामुळे रोजच पितरांना स्मरण केले जाते. काही व्यक्ती नाशिक, अलाहाबाद, काशी, मातृगाया, पितृगया आदी ठिकाणी जाऊन श्राद्ध मुक्तीची पूजा करतात. सर्व पित्रांना तृप्तीसाठी देव , ऋषी, मनुष्य, पितर, पशु, पक्षी सूक्ष्मजीव, जंतू, पृथ्वी आदी सर्व पंचमहाभूते तुमतेसाठी हा विधी तर्पण मध्ये केला जातो. या पंधरवड्यात पित्रांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी अन्नदान केले जाते.
घरात पित्र शांतीसाठी मनुष्य ज्या तिथिस मरण पावला, त्यास मोक्ष मिळावा यासाठी अन्नदान केले जाते व मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावाने जेवण दिले जाते. यापूर्वी नैवेद्य दाखविला जातो. यात कावळ्याने घास घेतल्याशिवाय घरातील सर्व सदस्य अन्नग्रहण करत नाही.
यामुळे कावळ्यास पितृपक्षात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कावळ्यास अनेक प्रकारचे ज्ञान आहे त्यास शुभ-अशुभ संकेत मिळत असतात. त्यास दिव्यदृष्टी असल्याने तसे संकेत तो मनुष्यात देत असतो.
पितृपंधरवड्यात कुठल्याही कार्य केले जात नाही प्रकारचे शुभ कार्य म्हणजेच मृत्यूनंतर मोक्षप्रामीसाठी पितृपंधरवडा पाळला जातो. मनुष्य मरणाची तिथी माहिती नसल्यास सर्वपित्री अमावस्येस श्राद्ध घातल्यास पितरांना तो नैवेद्य मिळत असल्याचे सांगितले जाते.
