दिंडोरी येथील सेवाभावी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी येथील साई श्रद्धा सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून दिंडोरी तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिंडोरी शहरातील ४ करिअर अकॅडमीमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्नींग शूजचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने दिंडोरी शहरातील ४ आभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी, पोलीस भारती, तलाठी भरती, आर्मी भरतीसाठी सरळ सेवा भरतीचे ४ सेटचे वितरण करण्यात आले. तसेच दिंडोरी शहरातील कोविड काळात घरोघरी जाऊन लसीकरण करणाऱ्या आशा सेविकांचा मंडळाच्या वतीने एक भेट वस्तू तसेच गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. दिंडोरी शहरातील

किन्नर समाजाला आरतीचा मान देऊन त्यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी खासदार भास्कर भगरे, माजी आमदार धनराज महाले, सार्वजनिक गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत राजे, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, नगराध्यक्षा सुनीता लहांगे, उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे, नगरसेविका शैला उफाडे, आशा कराटे, नगरसेवक दिपक जाधव, सुजित मुरकुटे, सलीम भाई मिर्झा, रणजित देशमुख, सतीश

देशमुख, मनभरी क्लॉथ सेंटरचे संचालक उमाकांत घोंगडे, दिनकर काजळे साहेब, डॉ. विलास देशमुख, डॉ. योगेश थिगळे, शिवसेना उपमाहानगर प्रमुख सुनील निरघुडे, प्रफुलचंद्र कुमावत, तुषार वाघ, तौसिफ मणियार, छबू मटाले, बब्बू शेख आदींसह मंडळाचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन साधना पेलमहाले यांनी केले. यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!