संगमनेर संपत भोसले तालुक्यातील निळवंडे येथे आमदार अमोल खताळ यांच्या आमदार विकास निधीतून मंजूर झालेल्या निळवंडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभा मंडप कामाचे भूमिपूजन सौ.नीलम खताळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
निळवंडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिराच्या समोरील सभा मंडप मंजूर करावा अशी मागणी निळवंडे गावच्या सरपंच सौ.शशिकला पवार व उपसरपंच भाऊसाहेब आहेर यांच्यासह ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती.
आमदारांनी ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सभा मंडपासाठी आमदार निधीतून १० लाख रुपये जाहीर केले होते त्या नुसार आमदार खताळ यांनी आमदार निधीतून सभा मंडप मंजूर केला आहे.त्या सभा मंडपाचा भूमिपूजन समारंभ आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी निळवंडेच्या सरपंच सौ.शशिकला पवार उपसरपंच भाऊसाहेब आहेर तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी आहेर.उपाध्यक्ष राजेंद्र वारे ग्रामपंचायत सदस्य सुनीता भुसारी यांच्यासह गावा तील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून निळवंडे गावाचा विकास अधिक गतीने होणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
