सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवासाठी जादा बसेसची व्यवस्था

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड सप्तशृंगी निवासिनी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून सुमारे २५० एस.टी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती एस. टी. च्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
खान्देशचे माहेर असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीचा यात्रोत्सव सोमवार (दि.२२) पासून सुरू होत आहे.यात्रोत्सव कालावधीत खासगी वाहनांना गडावर जाण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या यात्रा उत्सवासाठी संपूर्ण देशातून भगवती भक्त मोठ्या संख्येने येत असतात. या कालावधीत सप्तशृंगगडावर जाण्यासाठी नांदुरी व सप्तशृंगगड येथे तात्पुरत्या स्वरूपाचे वाहनतळ उभारण्यात आले आहे. नांदुरीहून सप्तशृंगगडावर जाण्यासाठी भाविकाची गर्दी लक्षात घेऊन एस.टी.बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे.नांदुरी ते सप्तशृंगी गड येथे जाण्यासाठी सुमारे १५० बसेसची व्यवस्था करून देण्यात आली असून,

नाशिक व मालेगाव येथून १०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून गडावर येण्यासाठी प्रत्येकी दहा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. यात्रा कालावधीत सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक भक्त येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांदुरी व सप्तशृंगगड येथर्थाल वाहनतळावर पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. घाट स्त्यावर मोबाईल व्हॅन व क्रेनची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या भाविकांना वाहतुकीची कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एस.टी. प्रशासन सज्ज असल्याची माहिती कळवण आगार प्रमुख राहल बोरसे यांनी दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!