आपला धर्म कुठलाही असो जात कुठलीही असो हे निवडून दिलेले लोक देशापुढचे प्रश्न सोडवू शकत नाही आपल्याकडे दुर्लक्षच करतील हे सर्वाना जाणवतं आणि आताच बदल घडला नाही घडवून आणला नाही तर देश कमकुवत होईल ब्रेनपोलिओग्रस्त होईल आपल्या राष्ट्राच्या इतिहासात कधीच नव्हती गरज निर्माण झाली आहे,ती नव्या पद्धीच्या राजकारणाची भारत म्हणून असलेल्या समतामूलक राजकारणाची आपलं समाज जीवन आणि राजकारणातील शिळेपणा घालवून आता आपलं राजकारण बदलण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी. छाया रेखांकन प्रकाश कदम
समाज जीवन आणि आमचं राजकारण आता बदलण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी हि संविधानिक प्रक्रिया कशी असेल याबद्दल लोकांना माहिती नसेल तर सर्वाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुजन समाज जोडो अभियान आताच सुरु करायला हवे आणि भारतील खऱ्या शासक वर्गापुढे आव्हान निर्माण करायला हवे आज महाराष्ट्रातील एका शिवसेनेच्या दोन शिवसेना हा सुद्धा येथील खऱ्या शासक वर्गाचा डाव आहे.कारण राजकारणात नवनवीन घटक सामाविष्ट झाले तरी वर्षानुवर्षे शासक तेच राहतात जे चिकित्सक आणि सर्जनशील लोकांना कधीच संसदेत येऊ देत पुर्वी मतपत्रिकेत घोळ करुन सरकार आव्हान करणाऱ्या लोकांना संसदेत येण्यास मज्जाव केला आता ई.व्हि.एम.मशीन मुळे रोक भक्कम होतांना दिसते.पुर्वी काँग्रेस प्रबळ होती त्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मजबुत रिपब्लिकन विरोधी पक्ष दिला रिपब्लिकनच्या धास्तीमुळे काँग्रेसने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला जन्म दिला.संघाने भारतीय जनता पक्षास जन्म दिला आणि जो प्रभावी विरोधी पक्ष होऊ शकणार होता त्या रिपब्लिकनच्या खऱ्या शासकाने चार फळ्या केल्या आणि आज त्या चार फळ्यांच्या चिरफळ्या झाल्या आहेत..
दिनकर गायकवाड
कार्यकारी संपादक
सिटीलाईन वेब न्यूज
