एक वर्षापासून चोरी छुपे पाठलाग करताना केले अपहरण

Cityline Media
0
आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

 नाशिक दिनकर गायकवाड एक वर्षापासून अल्पवयीन मुलीचा चोरी छुपे पाठलाग करून तिला कशाचे तरी आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना वडाळा गावात घडली पोलिसांनीआरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
               छाया रेखांकन-प्रकाश कदम 
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी हे वडाळा गावात राहतात.आरोपी सुनील भाऊराव मोंढे (वय २७, रा. पिंगुळबाग, समतानगर, वडाळा गाव) हा गेल्या वर्षभरापासून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. त्याने दि. १९ सप्टेंबर रोजी या मुलीला गाठून तिला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून अपहरण केले. तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ही मुलगी मिळून आली नाही.या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सुनील मोंढेविरुद्ध पोक्सो अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!