बुद्धीबळ स्पर्धेत रोझलँन्ड इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थिनी नेवासा तालुक्यात प्रथम

Cityline Media
0
नेवासा प्नतिनिधी तालुक्यातील श्री.शनैश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनई येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील सीबीएसई पॅटर्न चे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल मधील कु. जान्हवी शंतानू सुर्यकर हिने बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
तिची आता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड झाली आहे. ती अहिल्यानगर येथे होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत नेतृत्व करणार आहे.तालुकास्तरीय स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात बऱ्याचशा विद्यार्थीनी सहभागी झालेल्या होत्या.

एकूण पाच फेऱ्या खेळवण्यात आल्या. त्यामध्ये रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल हंडीनिमगाव ची विद्यार्थीनी जान्हवी शंतानू सुर्यकर या विद्यार्थीनी ने सर्व फेऱ्या जिंकल्या आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे प्राचार्य मॅथ्यू येवले, उपप्राचार्य पिटर बारगळ , क्रीडा शिक्षक सोनटक्के, वर्ग शिक्षिका कोमल घोरपडे यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!