नाशिक दिनकर गायकवाड कळवण येथील लोकनेते ए.टी. पवार कृषी उत्पन्न बाजार समितीने आ.नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून विविध विकासकामे करून काटकसर करत या आर्थिक वर्षात ६ कोटी ७ लाख ९० हजार विक्रमी उत्पन्न झाले आहे. खर्च वजा जाता ३ कोटी ५० लाख ५५ हजार ५३६ रुपयांचा नफा झाल्याची माहिती लोकनेते ए. टी. पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी दिली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
दिवंगत.ए.टी.पवार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २२ व्या सर्वसाधारण सभेत बोलताना पवार यांनी महिती दिली. अध्यक्षस्थानी सभापती धनंजय पवार होते. व्यासपीठावर उपसभापती बाळासाहेब वराडे, यशवंत गवळी, सोमनाथ पवार, बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर खैरनार, शितलकु मार
आहिरे,योगेश महाजन,योगेश शिंदे, प्रवीण देशमुख, ज्ञानदेव पवार, दिलीप कुवर, पंढरीनाथ बागूल, प्रवीण देशमुख, भरत पाटील, दत्तू गायकवाड, शशिकांत पवार, सुनीता जाधव, रेखा गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी विविध संस्थेवर निवड झालेल्या मान्यवरांच्या सत्कार संचालक मंडळ वतीने करण्यात आला. सभापती धनंजय पवार म्हणाले की, बाजार समितीला आर्थिक वर्षात विक्रमी नफा झाला असून विद्यमान संचालक मंडळाने सुरु केलेल्या कामकाजात खर्चात काटकसर केली. योग्य नियोजनाद्वारे व्यावहारिक दृष्टिकोनातून कामकाज करताना शेतकरी, व्यापारी व कामगार यांना केंद्रबिंदू मानून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून उपबाजार आवार नाकोडा येथे लिलाव शेड, यार्ड डांबरीकरण, टॉयलेट ब्लॉक काम करण्यात आले. अभोणा उपबाजारात हायमास्टलाईट
बसविण्यात आले. नाकोडा व अभोणा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. कनाशी येथे नवीन आवारात भुईकाटा व कार्यालय, लिलाव शेड उभे करण्यात येणार असल्याचे सभापती धनंजय पवार यांनी सांगितले. सचिव रवींद्र हिरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून आर्थिक वर्षाचा अहवाल वाचन केले. आर्थिक पत्रकाबाबत विचार विनिमय करण्यात येऊन नाकोडा, कनाशी, अभोणा उपआवारातील कामकाज, विविध विकास बांधकाम यांना मंजुरी घेण्यात आली. यावेळी विलास रौदळ यांनी शासनाने कांदा निर्यात बंदी उठवावी व विक्री झालेल्या कांदावर अनुदान देण्यात यावे असा ठराव मांडण्यात आला यावेळी सभासदांनी एकमुखी पाठिंबा देत ठराव पास करण्यात आला. यावेळी सभासदांनी विविध मुद्यांवर चर्चाकरण्यात आली. यावेळी रोहित पगार, राजेंद्र भामरे, धिरेनकुमार पगार, संभाजी पवार,बाळासाहेब जाधव, विलास रौंदळ, विष्णू बोरसे, राहुल पगार, सुनिल महाले, राजेंद्र आहे, शिवा जाधव, मधुकर वाघ, हरीभाऊ पगार, विलास गवळी,दिपक खैरनार, चेतन निकम,आभिमन गुंजाळ, कैलास रौंदळ,सुनिल जाधव आदी उपस्थित होते.
