म्हैसगावचा आर ओ प्लँट बंद;विद्यमान सरपंच बॉडी निष्क्रिय

Cityline Media
0
३ लाख ३० हजाराचा वापर की ‌गैरवापर

राहुरी कमलेश विधाटे राहुरी तालुक्यातील म्हैसगांव मध्ये घरोघरी स्वच्छ पाणी पिता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत १५ वित्त आयोग मार्गाने गावठाण अंतर्गत आर ओ प्लॅन्ट जवळ जवळ ३ लाख ३० हजार रुपये खर्च करून नामधारी तयार करण्यात आले आहे परंतु या मधुन एक थेंब पाणी सुद्धा आता पर्यंत पिण्यासाठी बाहेर निघाले नाही . खुप सारे पैसे खर्च करू हा प्लॅन्ट अतिशय निकृष्ट दर्जेचा बनवलेला आहे असे बोलले जातेय.
गावातील प्रत्येक कुटुंबाची पाणी ही अतिशय महत्त्वाची असून आधीच डोंगराळ भागात हे गाव असून इकडे शासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे आणि राजकारणी नेते फक्त निवडणूक काळातच इकडे येतात त्यामुळे कुठल्याही योजनेचा इथे फज्जा होताना दिसतोय आज येथे सर्वसामान्य नागरिकांना पाण्याची गरज आहे.

म्हैसगांव मधील गावठाणला पिण्याचे पाणी येथील सर्व नागरिकांना मिळावे म्हणून गावठाण मधील बोरवेल व संजय गागरे यांनी स्वःताची जागा कृतज्ञ भावनेने ग्रामपंचायत दिली आहे त्या ठिकाणी देऊन ही रोजगार हमी मार्फत विहीर बनवली आहे त्या विहीरीतील पाणी १ कि.मी. म्हैसगांव गावठाण मधील खुप जिर्ण आणि अस्वच्छ टाकीमध्ये टाकले जात आहे.

त्या मध्ये बोरवेलचे ही पाणी टाकले जाते दोन्ही पाणी एकत्र करून संपूर्ण गावाला पाजले जातेय ते अस्वच्छ पाणी पिऊन दिवस काढावा लागत आहे यामुळे अनेक ग्रामस्थ व महिला आजारी पडत आहे परंतु नवीन उभारलेल्या या प्लॅंन्ट कडे जाणून बुजून ग्रामपंचायत,पाणीपुरवठा कर्मचारी दुर्लक्ष करत आहे.

नवीन प्लँन्टच्या पाण्यापासुन म्हैसगावच्या सर्व नागरिकांना वंचित राहावे लागत आहे हा प्लॅंट बसविला त्याच दिवशी सुरू केला असता तर सर्वसामान्यचा प्रश्न मिटला असता आणि गावातील लोकांची पाण्याची वणवण आणि भटकंती थांबली असती परंतु हा प्लँन्ट सुरू करण्यास ग्रामपंचायत अक्षरशः असफल ठरली आहे याकडे दर दिवस दुर्लक्ष करणारी म्हैसगाव ग्रामपंचायत हा फ्लॅट सुरू करते की नाही हा यक्षप्रश्न  निर्माण होत आहे त्यामुळे या पाण्यासाठी सर्वाना संघर्षाचा सामना करावा लागणार यात तिळमात्र शंका नाही.

जल जीवन मिशन योजने अंतर्गत म्हैसगांव मध्ये १ कोटी ७३ लाख ९६ हजार ६८७ रू चे काम म्हैसगांव मध्ये चालू होते परंतु त्यामध्ये काही ठिकाणी पाईप लाईन व एक टाकीचे काम चालू होते परंतु दोन्ही पक्षाच्या अंतर्गत वादमुळे काम बंद करण्यात आले आहे तो प्रकार या प्लॅन्टच्या बाबत होत आहे का? आशी चर्चा ग्रामस्थ मध्ये जोर धरु लागली आहे यासाठी ग्रामसेवक,सरपंच,सदस्य या आर ओ प्लॅंन्टकडे दुर्लक्ष करत आहे 

हा प्लॅन्ट चालू होण्यासाठी गट विकास आधिकारी यांनी लक्ष देऊन चालू करावा नाही तर असाच खितपत पडून राहील अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा होत आहे तर हा प्लँट चालू होईल की नाही याबात सर्व ग्रामस्था मध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे हा प्रश्न कधी संपेल चालू होईल हे मात्र गुलदस्त्यात आहे .
पत्रकारांच्या बातम्यांना घाबरत नाही 
 अरुण पवार ( महिला सरपंच पती )
मी नवीन ग्रामसेवक 
नितिन  गिरी  ग्रामसेवक म्हैसगांव ग्रामपंचायत 

म्हैसगांव ग्रामपंचायत बॉडी याबाबत  अनभिज्ञ
 भिमा दुधाट ( उपसरंपच म्हैसगांव )
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!