झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे श्री क्षेत्र चांदवड रेणुका माता येथून आणलेल्या ज्योतीची गावातून भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
गावातील लक्ष्मी माता तरुण मित्र मंडळ भक्त जवान देवीची ज्योत आणण्यासाठी चांदवड येथील रेणुका माता देवीकडे रवाना झाले होते. हे तरुण पायी चालत देवीची ज्योत घेऊन झरेकाठी पाटाजवळ आले आणि गावकऱ्यांनी डीजेच्या तालावर या ज्योतीचे गावातून मिरवणूक काढली.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.महिलांनी या ज्योतीची विधीवत पूजा करून प्रत्येक दारात आल्यानंतर ज्योती मध्ये तेल टाकून दर्शन घेतले.भर पावसात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी ज्योत आणण्यासाठी गेलेले तरुण अनिल बर्डे,सुरेश बर्डे,वाल्मीक शिंदे,सोमनाथ डोळे,संदीप बर्डे, शरद माळी,अशोक माळी, गोकुळ माळी,रवींद्र बर्डे,सचिन बर्डे,किरण शिंदे,विकास शिंदे, भारत शिंदे,गोरख शिंदे,छबु शिंदे, अजय मोरे,शंकर माळी,नवनाथ बर्डे,सिद्धार्थ निकम,मनोज शिंदे, अमोल शिंदे,ईश्वर शिंदे,दिलीप माळी, राहुल पवार,बाळू पवार, संतोष मोरे,काळू मोरे,महेंद्र शिंदे, कार्तिक बर्डे,किरण पवार,श्याम पवार,सचिन पवार,आदींनी ज्योत आणण्यासाठी परिश्रम घेतले.
