सुरगाणा येथे विविध शाळेतील सतरा संघ जिल्हा पातळीवर

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुका स्तरीय सांघिक खेळ क्रीडा स्पर्धा सुरगाणा तालुका क्रीडा अधिकारी सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.जिल्हा परिषद, शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळांनी सहभाग नोंदविला होता. यात कबड्डी, खोखो, हॅन्डबॉल, हॉलीबॉल, बुद्धिबळ, हे सांधिक खेळ खेळविण्यात आले असून सतरा संघ जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.
सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेतील आश्रमशाळा आणि विद्यालय विभागाच्या संघांनी संस्थेच्या विजयाचे वर्चस्व यावर्षीही कायम ठेवले आहे. प्रामुख्याने बुद्धीबळ खेळ प्रकारात १४ वर्ष मुलांच्या बयोगटात प्राथमिक आश्रमशाळा अलंगुण संघ विजयी ठरला. १४ आणि १७ वर्ष वयोगटात मुलीच्या सामन्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उंबरपाडा यांनी विजय मिळविला. 

हॅन्ड बॉल खेळ प्रकारात १७ आणि १९ वर्ष वयोगटात माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगून ने बाजी मारली. कबड्डी खेळ प्रकारात स्पर्धेतील १४ वर्ष वयोगटात प्राथमिक आश्रमशाळा अलंगून च्या मुलांनी आणि शहीद भगतसिंग विद्यालयाच्या मुलींनी बाजी मारली. कबड्डीच्या १७ वर्ष वयोगटात चिंचला आश्रमशाळेच्या मुला-मुलींनी विजय मिळविला.

कबड्डी खेळ प्रकारात १९ वर्ष वयोगटात चिंबला आश्रमशाळेच्या मुलांनी आणि अलंगुण आश्रमशाळेच्या मुलींनी बाजी मारली. खो-खो या सांधिक खेळ प्रकारात १४ वर्ष वयोगटात सामन्यात अलंगून आश्रमशाळेच्या मुला-मुलींनी आपल्या संघाकडे विजयश्री खेचून आणली.

१७ वर्ष बयोगटात अलंगुण आश्रम शाळेच्या मुलांनी आणि खिर्डी आश्रमशाळेच्या मुलींनी विजय मिळविला. १९ वर्ष वयोगट असलेल्या अटीतटीच्या खो-खो सामन्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण मुलामुलींच्या संघाने आक्रमक खेळ करत एकहाती विजय मिळवून यश संपादन केले.

सांघिक खेळ प्रकार स्पर्धेत शिक्षण संस्थेच्या विद्यालय आणि आश्रमशाळा विभागातील शाळांनी तालुक्यातील इतर शाळांना कड़वी झुंज देत आपल्या शिक्षण संस्थेकडे विजयश्री खेचून आणल्याने जिल्हा पातळीवर झेप घेतली आहे. तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत संस्थेच्या विजयाची परंपरा टिकवून ठेवले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!