नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून शासनाने तातडीने बाह्यवळण रस्ता मंजूर करावा व वाहतूक कोंडी सोडाबाबी,अशी मागणी राष्ट्रबादी काँग्रेसचे गटनेते अविनाश जाधव यांनी केली आहे.
सध्या दिंडोरी शहरात जनता विद्यालयापासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत प्रचंड वाहतूक कोडी होत असते.दुतर्फा वाहने अडकून पडतात. त्यामुळे खूप वेळ बाया जातो. दिंडोरी शहराची लोकसंख्या वाढत चालली असून त्यामुळे वाहने सुध्दा वाढली आहे. येणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सप्तशृंगगड, सापुतारा येथे जाणारे भाविक, पर्यटक जास्त राहतील.
तसेच गुजरात मार्गे येणारे पर्यटक सुध्दा जास्त राहतील, त्यामुळे दिंडोरी शहरात फार मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. म्हणून येणाऱ्या सिंहस्थ पर्वाचे नियोजन करतांना दिंडोरी शहराला लागून बाहा बळण रस्ता मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश जाधव यांनी केली आहे.
