व्हाट्सअप द्वारे चालविला जात होता वेश्याव्यवसाय;पोलिसांनी केला भांडाफोड

Cityline Media
0


सूरत सिटीलाईन न्यूज नेटवर्क शहरातील जहांगीरपुरा भागातील पार्क पॅव्हेलियन नावाच्या हॉटेलमध्ये चालणा-या एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईत थायलंडमधील १३ परदेशी मुलींना अटक करण्यात आली आहे.               छाया रेखांकन प्रकाश कदम 
पोलिसांनी एकूण १३ तरुणी आणि ९ पुरुषांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हाय प्रोफाइल सेक्स कैट घालवणारे लोक हटिलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून ३५०० ते ५००० रुपये आकारत होते. बाई महिलांना १५०० रुपये दिले जात होते. सूरत शहरातील जहांगीरपुरा भागात ॲपद्वारे हे सेक्स स्केट चालवले जात होते.

सुरत पोलिसांच्या जहांगीरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील जहांगीराबाद कॅनाल रोडवरील वासू पूज्य या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या पार्क पॅव्हेलियन हटिलमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हॉटेलया दरवाजा ठोठावला. परंतु आतून कोणीही उत्तर दिले नाही. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर, पोलिसांना प्रथम एक हॉल सापडला. जिथे एक काउंटर टेबल आणि खुर्ष्या ठेवल्या होत्या.

काउंटरच्या हाण्या बाजूला असलेल्या कॉरिडॉरमधून पुढे गेल्यावर, ४०३ क्रमांकाच्या खोलीत ७ ग्राहक असल्याचे आढळले. पोलिसांनी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रूपेश उर्फ रूपेश मिक्षा नावाच्या व्यक्तीची चौकशी सुरू केली. त्याने पोलिसांसमोर कबूल वेले की, तो ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना परदेशी महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करु देत होता. याशिवाय, संजय हिंगाडे आणि राहुल सोलंकी हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग करायचे, तर बिपिन उर्फ बंटी बाबरिया व्यवस्थापक म्हणून काम करायचा.

चौकशी दरम्यान रूपेश मिश्राने पोलिसांना सांगितले की, या केटया मुख्य संचालक विजय मोहन कस्तुरे आहे, जो हॉटेलचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचा पगार सांभाळतो. हे व्हॉट्सॲपद्वारे चालवले जात होते आणि ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेंट घेतले जात होते. हे सर्व पैसे योगेश दिलीप तळेकर नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात जात होते. याशिवाय अशोक मामा नावाचा ड्रायव्हर महिलांना आणत आणि घेऊन जात असे. पोलिसांनी हॉटम व्यवस्थापक आणि ग्राहकांसह एकूणा ९ आरोपीना अटक केली आहे आणि १३ परदेशी महिलांना पुढील चौकशीसाठी जहांगीरपुरा पोलिस ठाण्यात सोपवले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!