हंगेवाडी गावातील स्वस्त धान्य दुकानातून सोंडे,आळ्यांचे सडलेले धान्य ग्रामस्थांना वितरित

Cityline Media
0
आझाद समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शेळके यांना गावगुंडाकडून बेदम मारहाण 

संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील हंगेवाडी गावात रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित करण्यात आले आहे.सडलेला गहू आणि आळ्या लागलेले तांदूळ नागरिकांना वाटप करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.यामुळे रेशन ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हंगेवाडी गावचे रहिवासी असलेले आझाद समाज पार्टीचे संगमनेर तालुकाध्यक्ष अमोल शेळके यांनी संगमनेर येथील पुरवठा अधिकाऱ्यांना थेट खराब धान्य दाखवून वस्तुस्थिती समजावून सांगितली.मात्र,अधिकाऱ्यांनी "आम्ही काय करू?" अशी प्रतिक्रिया देत जबाबदारी झटकली.यामुळे रेशन ग्राहकांना न्याय कुणाकडे मागायचा,असा सवाल उपस्थित झाला आहे.

खराब धान्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या नागरिकांना तीन महिन्यांतून एकदा रेशनिंगद्वारे धान्य मिळते.गेल्या चार दिवसांत संगमनेर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले.मात्र हंगेवाडी गावांमध्ये सडलेला गहू व आळ्या लागलेला तांदूळ देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे धान्य खाल्ल्याने पोटदुखी, विषबाधा, इतर आजार होण्याची शक्यता आहे.तथापि,पुरवठा विभाग व संबंधित यंत्रणांकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करत हंगेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेळके यांनी संगमनेर येथील पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांना खराब धान्याचे व्हिडिओ पाठविले.आणि आझाद समाज पार्टी संगमनेर तालुकाअध्यक्षाच्या वतीने कळविण्यात आले की नुकतेच हंगेवाडी गावात स्वस्थ धान्य वाटप सुरू होते परंतु अमोल रमेश शेळके यानी संगमनेर तहसिलदार तसेच अहमदनगर पुरवठा अधिकारी हेमा बडे  यांना या निकृष्ट आणि सडलेल्या धान्यबाबत सविस्तर विडियो पाठविले असता पुरवठा अधिकाऱ्यांनी संगमनेरचे पुरवठा अधिकारी गणेश भालेराव याना घटनास्थळी जाऊन लेखी पंचनामा करण्याचे आदेश दिले परंतु संपूर्ण गाव एकत्र येऊन सविस्तर प्रकार तसेच त्यांनी केलेल्या पंचनामा बोगस आहे असा आरोप अमोल शेळके यांनी केला आहे हंगेवाडी येथील बौद्ध आदीवासी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या लोकांनी सोंडे आणि आळाया खावा लागत आहे.हा सविस्तर प्रकार श्री.शेळके यांनी वरीष्ठ पातळीवर कळविल्यानंतर गावगुंडानी त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा मोबाईल गाडी जमा करून घेतली हा प्रकार आश्वी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्या निदर्शनास आणून दिला असता निरिक्षक सोनवणे यांनी पोलिसांना आदेश दिला केले अमोल शेळके यांचा मोबाईल आणि गाडी आपण घटनास्थळी जाऊन देण्यात यावी व पंचनामा करण्यात यावा परंतु गावातील गावगुंड आणि विघ्न संतोषी लोक अमोल शेळके यांना कट कारस्थान करुन मारहाण करण्याचा डाव रचत आहे असा आरोप श्री.शेळके यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला.मात्र, "आम्ही काय करू शकतो?" असे म्हणत अधिकाऱ्यांनी हात झटकले.
अनेक लोक खराब धान्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत, "वाटपासाठी आलेले रेशनिंग धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून,नागरिकांच्या मनात संतापाची भावना आहे.जर प्रशासनाने योग्य दर्जाचे धान्य पुरवले नाही,तर आमदार आणि खासदारांनीच हे धान्य खाऊन दाखवावे," अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे या सडलेल्या आणि खराब धान्याबाबत प्रशासकीय कारवाईची अपेक्षा येथील जनतेने व्यक्त केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!