अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई
अहिल्यानगर प्नतिनिधी दोन समाजात विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होऊन वाद निर्माण होईल या हेतूने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या येथील एका इसमावर कोतवाली पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९०२/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३५३(२), ३५६(२), ३५२ प्रमाणे गुन्हे दाखल झाला असता,सदर गुन्ह्यांतील आरोपीची माहिती घेऊन,गुन्हा उघडकीस आणणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले.स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने या गुन्हेगारास त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दिपक मेढे,श्रेणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ/ शाहिद शेख, पोहेकॉ/ सुनिल पवार, पोहेकॉ/ अतुल लोटके, पोहेकॉ/ दिपक घाटकर, पोहेकॉ/ सुयोज सुपेकर, पोहेकॉ/ फुरकान शेख, पोकॉ/ सागर ससाणे, पोकॉ/ अमृत आढाव, पोकॉ/ योगेश कर्डील, पोकॉ/ प्रशांत राठोड, पोकॉ/ प्रमोद जाधव यांचे दोन विशेष पथके तयार करुन, सदर पथकास सुचना व मार्गदर्शन करुन, पथके रवाना करण्यात आलेली होती.
नमुद पथकांनी गोपनिय माहिती व व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढुन,नमुद गुन्हयातील आरोपीचा अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी शोध घेतला.नमुद आरोपी वेषांतर करुन फिरत असतांना, मोठ्या शिताफिने आरोपी नामे फरीद सुलेमान खान, वय ३० वर्षे, राहणार आलमगिर भिंगार, ता.जि.अहिल्यानगर याला ताब्यात घेऊन,त्यांचेकडे गुन्हया बाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता, त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले आहे.
सबब,ताब्यात घेतलेला आरोपी नामे फरीद सुलेमान खान, वय ३० वर्षे, राहणार आक्सा मंझिद जवळ, आलमगिर, भिंगार, ता.जि. अहिल्यानगर यांस कोतवाली पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नं ९०२/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३५३(२), ३५६(२), ३५२ प्रमाणे दाखल गुन्हयाचे पुढील तपास कामी कोतवाली पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास चालु आहे.
हि कारवाई. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलीस वैभव कलुबर्मे,अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर दिलीप टिपरसे,उपविभागीय पोलीस अधिकारी,अहिल्यानगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
