श्रीरामपूर दिपक कदम शहरातील विस्थापित व्यापाऱ्यांनी यावर्षी ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून बेरोजगारी आणि उदरनिर्वाहाच्या समस्यांमुळे व्यापाऱ्यांचे आयुष्य अंधारात गेले असून,जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुनर्वसनाच्या आश्वासनांवर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी विस्थापित व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की,“दिवाळी आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा सण असतो.
या काळात आम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळतो,कुटुंबाला कपडे, गोडधोड,फटाके घेता येतात. मात्र यंदा ना दुकानं आहेत, ना उत्पन्न.त्यामुळे आम्ही दिवाळीचा आनंद नाही, तर वेदनांनी साजऱ्या करणार आहोत.
अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानंतरही मुख्याधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रियेमध्ये दिरंगाई केली आहे. ही बाब मा.खासदार सुजय विखे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून शासन दरबारी प्रस्ताव पाठवले आहेत.
आर्किटेक्टलाही व्यापाऱ्यांसाठी गाळ्यांचे डिझाईन तयार करण्यास सांगण्यात आले आहे.तथापि,सध्या सुजय विखे ‘शिवपुराण’ कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी कार्यक्रमानंतर तातडीने श्रीरामपूरला येऊन व्यापाऱ्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे.
“शहरातील एकही व्यापारी विस्थापित राहणार नाही,” असा पुनरुच्चार सुभाष त्रिभुवन यांनी यावेळी व्यक्त केला.वास्तविक पाहता, दिवाळीसारख्या मोठ्या सणात व्यापारीवर्ग हाताला काम नसल्याने हतबल झाला असून, पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती न दिल्यास नाराजी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावेळी राहुल शहाणे फयाज पठाण शरीफ शेख शाहरुख पिंजारी राहुल शिंपी मज्जित मेमन पोपट वाकचौरे शाहरुख बागवान शहीद शेख बापू सोनवणे विजय चोरमल अनंत वाघमारे वाशिम बागवान ताहेर बागवान वैशाली पालकर अलीम बागवान गणेश पालकर
विठ्ठल जावळे रमेश जावळे सत्तार पिंजारी विनेश वाघ नवीन खान दादा शेख विजय मगर अजय तिडके बिना लागतात सलमान शेख मुन्ना मणियार असलम अत्तर किरण कतारे किशोर नागरे मलिक बागवान अक्षय गवळी सुनील दंडवते रवी चव्हाण श्रीकृष्ण लावर अल्ताफ आतार कैलास बाविस्कर आयुक्त सरदार आत्तार बेबी पालकर असलमत्ता राकेश थोरात सन्मान मालिक प्रदीप निकुंभ आदिनाथ सुपेकर इब्राहिम बागवान इकबाल खान गणेश कुवर आधी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
