नाशिक दिनकर गायकवाड पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीमध्ये ठेवलेली बॅग व त्यातील लॅपटॉप व टॅबसह सव्वा लाखाची रोकड असा १ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत हॉटेल व्यावसायिक संदीप कृष्णा जगताप (रा. माधव पार्क अपार्टमेंट, गोसावीनगर, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. जगताप यांनी दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कालिका मंदिराच्या पाठीमागे बिझनेस वे इमारतीच्या पार्किंगमध्ये एमएच १५ डीएस ९३९१ या क्रमांकाची गाडी पार्क केली होती.
यावेळी आरोपी विशाल गणेश गांगुर्डे (वय २०, रा. सहवासनगर, कालिका मंदिरामागे, नाशिक) याने पार्किंगमधील गाडीत ठेवलेली बॅग व त्यातील १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, ४० हजार रुपये किमतीचा टॅब व १ लाख २७ हजार रुपयांची रोकड असा १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी विशाल गांगुर्डे याला अटक केली असून,पुढील तपास पोलीस हवालदार भुरे करीत आहेत.
