११ ते १३ ऑक्टोबरला नियोजन
नाशिक दिनकर गायकवाड राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार येवला मुक्तीभूमी येथे दि. १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुक्ति दिन - सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई न नांदेड तपोवन एक्स्प्रेसला नगरसूल स्थानकावर दि. ११, १२ आणि १३ ऑक्टोबर या दिवशी तात्पुरता र थांबा मंजूर करण्यात आला आहे.
या तीनही दिवशी मुंबई-नांदेड एक्स्प्रेस सकाळी ११.२४ वा., तर र नांदेड-मुंबई एक्स्प्रेस सायं. ३.५९ न वा. नगरसूल येथे पोहचेल. त्यामुळे - राज्यभरातून येणाऱ्या आंबेडकरी र अनुयायांना या रेल्वेचा विशेष फायदा होणार आहे.
दक्षिण-मध्य मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक संजयकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहून याबाबत मागणी केली होती.त्यांच्या या मागणीला दक्षिण मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद देत ती मंजूर केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित असलेल्या दादरची (मुंबई) चैत्यभूमी आणि नागपूरची दीक्षाभूमी या महत्त्वाच्या ठिकाणांनंतर येवला मुक्तिभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी रेल्वेकडून पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
या निर्णयामुळे, मुक्तिदिनी महाराष्ट्राभरातून येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी
अनुयायांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण तपोवन एक्स्प्रेसला मुक्तिभूमीपासून सर्वात जवळचा थांबा मनमाड रेल्वेस्थानकावर आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना मनमाड येथे उतरून पुन्हा मागे मोठे अंतर कापून यावे लागत होते. परंतु आता मुक्तिभूमीपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर असलेल्या नगरसूल येथे तीन दिवसांसाठी तात्पुरता थांबा मंजूर झाल्यामुळे कमी वेळात आंबेडकरी बांधव या ठिकाणी पोहचू शकणार आहेत.
