झरेकाठी सोमनाथ डोळे अहिल्यानगर जिल्ह्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापना करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्य पदी डॉ. किरण आहेर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून ,जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी या.संदर्भातील नियुक्तीपत्र डॉ.किरण आहेर यांना प्रदान केले.वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव ग्रामीण आरोग्य सेवेतील कार्य तत्परता आणि सेवाभावी दृष्टिकोन यामुळे डॉ.किरण आहरे.यांचे योगदान समितीच्या कामकाजासाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहे ,असा विश्वास आरोग्य वर्तुळातून व्यक्त केला जात आहे .
डॉ. किरण आहेर हे अनेक वर्षापासून ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती मोफत आरोग्य शिबिर आणि विविध सरकारी योजनांच्या तळागाळातील अंमलबजावणी साठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा ,लाभार्थ्यापर्यंत योजनेचे फायदे आणि आरोग्य क्षेत्रातील समन्वय अधिक सक्षम होईल ,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
या नियुक्ती बद्दल मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद मा. अध्यक्ष सौ शालिनी विखे ,वैद्यकीय संचालक प्राध्यापक डॉ.अभिजीत दिवटे ,तसेच डायरेक्टर क्लिनिकल सर्विसेस, ब्रिगेडियर
डॉ.अरुण त्यागी यांनी डॉ. किरण आहेर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आरोग्य योजनेच्या पारदर्शक आणि प्रामाणिक कारक अंबलबजावणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, रुग्णांना वेळेवर मदत आणि जिल्ह्यातील आरोग्य संस्थेमधील समन्वय यासाठी डॉ. किरण आहेर यांचा अनुभव समितीस निश्चितच लाभदायक ठरणारे आहे हा.असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
