नाशिक दिनकर गायकवाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी नामक न्यायधीशावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी हल्लेखोर राकेश तिवारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या फोटोला दूध अभिषेक करण्यात आला.
यावेळी समस्त आंबेडकरी समाजाकडून नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवेदन देण्यात आले.या आंदोलनात आकाश भालेराव, माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागूल, महेंद्र साळवे,
बाळासाहेब भालेराव, नयना वाघ, रवी गांगुर्डे, रवी जाधव, प्रवीण पगारे, संजय अढागळे,संतोष पाटील, किशोर खडताळे, अतुल चंद्रमोरे, अशोक जाधव,अजय जाधव, किरण हिरे, समीर संपत, प्रणव सोळसे, विशाल गांगुर्डे, विशाल घेगडमल, लालचंद शिरसाठ, मितेश भालेराव, मिलिंद दोंदे, शाम पगारे, भीमचंद चंद्रमोरे,सुनील दोंदे, राजू रिपोर्ट,चेता चंद्रमोरे,शरद गायकवाड,पाटील, अविनाश वाघ,अविना खरे, नाना पवार,संदीप भालेराव प्रशांत गांगुर्डे,अरुण भवर,पा तांबोळी,रोहन कांबळे आदी उपस्थित होते.
