समाजविघातक कृत्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी - सकल मुस्लिम समाजाची मागणी
श्रीरामपूर दिपक कदम अहिल्यानगर शहरात निघालेल्या एका संघटनेच्या दौड मध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करण्यात येवून दोन समाजात दरी निर्माण करत दंगल घडविण्याचे मनसुबे रचणाऱ्या अशा संबंधित दोषी आणी त्यांच्या आकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जे जे फाऊंडेशन चे संस्थापक व समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि समस्त श्रीरामपूर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने येथील मौलाना आझाद चौकात श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,अहिल्यानगर शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने निघालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमात अत्यंत गंभीर व समाजात तेढ निर्माण करणारी घटना घडलेली आहे. या कार्यक्रमामध्ये इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नाव मुद्दामहून विटंबना करण्याच्या उद्देशाने वापरले गेले. याव्यतिरिक्त शहरातील शारदा उत्सव मंडळासमोर “ आय लव मोहम्मद अशी रांगोळी काढून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना खोलवर जखमी करण्यात आल्या आहेत.
या अमानुष व समाजविघातक कृत्यामुळे शहरातील हिंदू–मुस्लिम ऐक्य धोक्यात आले आहे. शांतताप्रिय मुस्लिम समाजाच्या सहनशीलतेची सतत परीक्षा घेण्यात येत असून, अशा प्रकारे मुद्दाम धार्मिक विटंबना करून दंगल भडकविण्याचा, समाजात तणाव निर्माण करण्याचा व देशातील सौहार्द वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड विधानातील कलम १५३ ए (दोन समाजात तेढ निर्माण करणे), २९५ए (धार्मिक भावना दुखावणे), ५०५ (२) (दंगल भडकविणे) तसेच देशद्रोहाचा गुन्हा (कलम १२४ए) तातडीने नोंदवून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर सकल मुस्लिम समाजाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल व त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
त्यामुळे आपण त्वरीत कठोर पावले उचलून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा, अशी आम्हा सर्व मुस्लिम धर्मीय बंधू - भगीनी सकल मुस्लिम समाजाची नम्रपणे ठाम मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर जे जे फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,शोएब शाह, जीशान शेख,अफ़रोज़ शाह, फिरोज़ पठाण, सद्दाम कुरैशी, नाजिश शाह,हाजी फयाज बागवान, जाकिर शाह,सलीम शेख,अरबाज़ कुरेशी, मुबस्शीर पठाण,जुनैद शेख, जुबैर देशमुख,नब्बू शेख,शादाब शेख,आदिल पठाण,अरबाज़ शाह,ईमरान पठाण, अहमद सैय्यद,आदिल काकर, शोएब कुरेशी,अंसार सिद्दीकी, अकील काकर, सुफ़यान शाह,उमर शाह, आफताब शाह,अशफाक पिंजरी, अयाज़ शेख,जुबैर कुरेशी,तनवीर शेख, नदीम पठाण,शाहबाज़ कुरैशी, अयान खान,कारी साहिल, जाहीद बागवान,बिलाल शेख,असलम बागवान,जफर पटेल,अफ्फान शेख,शाहिद कुरैशी,अफ्फान बागवान, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
