लोणी प्नतिनिधी महाराष्ट्रात यंदा आलेल्या आस्मानी संकटामुळे बळीराजा अडचणीत असून बळीराजाला मदतीचा हात देताना आपलाही वाटा असावा, या भावनेतून प्रवरा परिवाराकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी एक कोटी रुपयांचं सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता.
लोणी येथील कार्यक्रमात या निर्णयाची अंमलबजावणी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १ कोटी रुपयांचा धनादेश आमचे नेते आणि केंद्रीय गृहतथा सहकार मंत्री अमित शाह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला. यावेळी राजेंद्र विखे यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते.
