नाशिक दिनकर गायकवाड राज्यातील आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
आदिवासी दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेना आणि संविधान बचाव देश बचाव जन आंदोलन जागृती अभियान राबविणारे संस्थापक प्रमुख दि.ना.उघाडे यांच्या वतीने आदिवासी दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मुख्य मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी दादर येथील रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव देण्यात यावे. तसेच वन जमिनीवरील अतिक्रमण,वन खात्यातील रोजगार, पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार, तसेच राज्यातील मुख्य दळणवळणाची रस्ते, लाईट, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था, स्मशानभूमीची सुविधा यासह महाराष्ट्रतील सुशिक्षित आदिवासी मागासवर्गीय महिला पुरुषांना रोजगार अशा विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय येथे लक्षवेधी निदर्शने केली.
याप्रसंगी अखिल भारतीय कार्यसम्राट सोमनाथ चौधरी, नाशिक जिल्हाध्यक्ष छगन गवळी,उपजिल्हाध्यक्ष धर्मराज चौधरी, प्रदेश राज्याध्यक्ष ॲड.आर.एस.पठाण, महानगरप्रमुख भागवत कवेकर, घोटी आदिवासी सेनेचे अध्यक्ष प्रदीप बेलेकर, पेठ आदिवासी सेनेचे अध्यक्ष पांडू रामा मेढे,जगन जोशी, जगन गवळी, सोमनाथ चौधरी, पुष्पराज भोई, ज्ञानेश्वर भांगरे,भगवान शेताडे, प्रवीण बेडेकर,भगवान केवडेकर व गणेश दौलत यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
