नाशिक दिनकर गायकवाड महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
यावेळी नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाला राजकीय प्रतिनिधीत्व मिळावे,स्वीकृत आमदार,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तसेच विविध महामंडळांवर संचालकपदे द्यावीत,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
विश्वास कांबळे म्हणाले,की स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षे उलटूनही नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाला राजकीय स्तरावर संधी मिळालेली नाही.राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता असली, तरी नाशिक जिल्ह्यातील मातंग
समाज अद्याप उपेक्षितच राहिला आहे. इतर जिल्ह्यांत काही प्रमाणात संधी मिळाली असली, तरी नाशिक जिल्ह्यातील समाजबांधवांना अद्याप त्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे.
समाजातील ज्या महिला स्मशानभूमीत काम करून उदरनिर्वाह करतात,त्यांचे पुनर्वसन करून त्यांना महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभागात नोकरीच्या संधी द्याव्यात,अशी मागणीही करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी लावणीसम्राज्ञी नंदा पुणेकर,ज्ञानेश्वर वाघमारे,सुनीता वाघमारे,त्र्यंबक सहाळे,सुनीता सहाळे, भीमसेन साळवे, बाळासाहेब आव्हाड आदी उपस्थित होते.
