श्रीरामपूर -दिपक कदम अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात अश्रू, कर्जाचा डोंगर,उद्ध्वस्त शेती उरले आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.खरीप पिक, सोयाबिन,कपाशी,तूर, भाजीपाला, फळबागा अशी सर्व पिके जमिनीत सडून गेली.
शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, जनावरे मृत्युमुखी पडली, घरामध्ये पाणी शिरून घरी पडली, रोगराईचे संकट उभा राहिला,कोरोना पेक्षाही मोठे संकट शेतकऱ्यावर उभे राहिले आहे अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिथे तलाठ्याला जाणे शक्य होत नाही त्या ठिकाणी ड्रोन च्या साह्याने तत्काळ पंचनामे करून, नुकसान भरपाई पंजाब सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना जगण्यासाठी दिलासा द्यावा.शेतकऱ्यांच्या आदरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना खोट्या घोषणा, पॅकेजेस कर्जमाफीची आश्वासने मिळतात.प्रत्यक्षात मात्र,ना योग्य पंचनामे होतात,ना वेळेवर मदत मिळते. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू व त्यांच्या घरातील चूल विझण्याची वेळ ही प्रशासनाच्या उदासीनतेचे परिणाम आहेत. तात्काळ सरकारने शेतावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीआम आदमी पार्टीच्या वतीने तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री,कृषिमंत्री,महसूल मंत्री यांना निवेदन पाठवून केली आहे.
