अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने बळीराजा गौरव रॅलीचे उत्साहात आयोजन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने ईडा-पिडा टळो! बळीचं राज्य येवो अशा भावनेतून बळीराजा गौरव महोत्सव-२०२५, बळीराजा गौरव रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
अत्याचार विरोधी कृती समिती च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बळीराजा गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून सुरूवात झाली पुढे हुतात्मा स्मारक सीबीएस येथे समारोप करण्यात आला.

यावेळी बळीराजा जिंदाबाद "ईडा-पिडा टळो बळीचं राज्य येवो,परिवर्तनवादी चळवळीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बळीराजाची वेशभूषा करुन जीवंत देखावा साकारणारे साक्षात बळीराजा दिलिप लिंगायत हे सर्वांचे आकर्षण ठरत होते.

यावेळी महिला व युवा वर्गाची संख्या लक्षणीय होती. प्रसंगी सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल महिला मंडळाचे कार्यकर्ते यांना धम्मसारथी महिलारत्न -२०२५" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर नाशिक ,आदर्श बुध्द विहार महिला मंडळ, तथागत बुध्द विहार उपासिका महिला मंडळ, नालंदा बुध्द विहार महिला मंडळ, धम्म नायिका महिला संस्था,, लुंबिनी बुध्द विहार कमिटी पदाधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला.

 रॅलीचे यशस्वीतेसाठी सहभागी संघटना मध्ये संभाजी ब्रिगेड,घंटागाडी कामगार संघटना,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर,भारत ज्ञानविज्ञान समुदाय, सत्याग्रही भूमी प्रतिष्ठान नाशिक,नशाबंदी मंच,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,वंचित बहुजन आघाडी, भाकप,माकप, विद्यार्थी संघटना,शेतकरी संघटना आदींसह विविध समविचारी भात्रृभावी संघटना यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲड. राहुल विष्णू तूपलोंढे यांनी केले.बळीराजा महोत्सवाची भूमिका प्रफुल्ल वाघ यांनी मांडली.काॅ.महादेव खूडे,शरद काळे,मनोहर पगारे,संविधान गायकवाड,सौ.रोहिणी जाधव, सिंधू वाघ,शैला भालेराव, चंद्रकला गांगुर्डे गौतमी शिरसाठ आदींनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.उपस्थित सर्व पदाधिकारी व मान्यवरांचा पुस्तिका पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन विकी गायधनी यांनी केले यावेळी पोलीसांचा बंदोबस्त चोख होता.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!