संभाजीनगरच्या बेकायदेशीर संघ कार्यालयावरील वंचितच्या जनआक्रोश मोर्चास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

Cityline Media
0
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांना संभाजी ब्रिगेडचे पत्र

औरंगाबाद प्नतिनिधी महाराष्ट्रच नव्हे तर भारतात जाती-जातीत, धर्मा-धर्मा मध्ये भांडण लावून, शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव,महाग झालेले शिक्षण,महिला सुरक्षा, नोकरी,आरक्षण, जनगणना, भ्रष्टाचार,महागाई महत्वाच्या बाबींपासून देशाच्या तरुणांचे आणि नागरिकांचे लक्ष भरकटवून, धर्म हा देशापेक्षा मोठा असल्याचे उदात्तीकरणं करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाणीवपूर्वक करत आहे.वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बेकायदेशीर संघ कार्यालयावरील जनआक्रोश मोर्चास प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाठिंबा जाहीर केला आहे तशा आशयाचे प्रसिद्ध पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निवेदनात म्हटले आहे की आज तरुणांना शिक्षण,रोजगार, नोकरी या विषयापासून दुर ठेवण्यासाठी हिंदू मुस्लिम वाद लावण्याचा कृती कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नियोजन बद्ध समाजात पेरत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वःताच्या संघटनेची कायदेशीर नोंदणी नसतानाही,शैक्षणिक संस्थेच्या आवारात जाणीव पूर्वक जॉईन आर एस एस या संकल्पनेचा माध्यमातून विद्यार्थ्यांना धर्माच्या नावाखाली एकत्रित करून या देशातील तरुणांना,विषमतावादी विचार देण्याचं काम करत होते, त्याला छत्रपती संभाजीनगर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय वाहुळ, राहुल मकासरे या दोघां वैचारिक वारसदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव हाणून पाडला होता.

त्याचा राग मनात बाळगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सत्ताधारी नेत्यांनी पोलीसांचा वापर करून या दोन कार्यकर्त्यांवर खोटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांना फिर्यादी केले आहे.

मुळात भारतात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने संविधानाच्या चौकटीत कार्यरत राहुन काम करण्याची शपथ घेतली असतानाही,ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची कुठेही कायदेशीर नोंद नाही,तरी ती एका शासकीय शैक्षणिक संस्थेमध्ये विनापरवानगी त्यांच्या संघटनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबवितात.

ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे,त्यांच्या वर कुठलिही कार्यवाही न करता पोलिस अंमलदाराचा खांद्याच्या वापर करून सदरील सामाजिक कार्यकर्तावर खोटे गुन्हे नोंद करण्यासाठी फिर्याद देण्यासाठी दबाव आणला याचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करत आहे.निवेदन पत्रावर प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड,जिल्हाध्यक्ष राहुल बनसोड पा‌.जिल्हाध्यक्ष योगेश शेळके धामोरीकर यांचे नावे आहेत

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!