सोलापूर प्नतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच जिल्ह्यातील श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या १०,००० मे.टन गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा आणि पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ पार पडला.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने १०,००० मे. टन गाळप क्षमतेचे विस्तारीकरण आणि पोटॅश प्रकल्प सुरू करून नवे पाऊल टाकले आहे.मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी मा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार उत्तम जानकर, आ.अभिजीत पाटील, आ.नारायण पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार दिलीप सोपल, सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील,आमदार नारायण आबा पाटील, आमदार समाधान आवताडे, आ.बाबासाहेब देशमुख, आ.राजू खरे, मा.आमदार जयवंतराव जगताप, दीपक साळुंखे, शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे,राजेंद्र राऊत,दत्तात्रय सावंत मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते.
