जामखेड पोलीस स्टेशनची कामगिरी
जामखेड प्नतिनिधी येथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना हे पथकासमवेत गस्त करत असताना त्यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, माहीजळगाव गावाकडून एक केशरी रंगाचा महिंद्रा कंपनीचा सहा चाकी मिनी कंटेनर येत असून त्यामध्ये गुटखा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे समवेत रात्री अधिकारी पोसई गावडे, पोकों/७५४ कुलदीप पांडुरंग घोळवे,पोकों/२४२७ देवीदास पळसे, बालक पोकों/४६० महादेव मिसाळ, होमगार्ड / ३४१६ संदिप चव्हाण असे कारवाई कामी रवाना झाले.
हे पथक अरणगाव गावात पहाटे ०४/३० वा. चे सुमारास मिळालेले माहीती प्रमाणे नमुद ठिकाणी येवून थांबले असता,एक संशयीत आयशर टेम्पो अरणगावकडे येत आसताना दिसला.बातमीमील नमुद माहीती प्रमाणे सदरचा आयशर टेम्पो आहे अशी पोलीस पथकाची खात्री झालेनंतर नायरा पेट्रोल पंपाशेजारी आयशर टॅम्पो चालकास हात दाखवून टेम्पो थांबवून त्यास त्याचे नाव गाव विचारला असता,त्याने स्वताचे नाव वैभव अशोक घायाळ वय २६ वर्षे रा. गवळवाडी ता. पाटोदा जि. बीड असे असल्याचे सांगितले. सदरच्या आयशर टेम्पो नंबर एम. एच. १२ वाय. बी. ०८२३ मध्ये असलेल्या माला विषयी आयशर टेम्पो चालक यांचेकडे विचारपुस केली असता, आयशर टेम्पो चालक याने त्यामध्ये गुटखा असलेचे सांगितले.
टेम्पोमध्ये पान मसाला गुटखा व तंबाखु असलेची पोलीस पथकाची खात्री झालेनंतर बालकास टेम्पोसह ताब्येत घेवून जामखेड पोलीस ठाणे येथे आणून आयशर टेम्पोची सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी दोन पंचासमक्ष तपासणी केली असता. त्यामध्ये ३४,९४,६४०/- रू किमंतीचा हिरा कंपनीचा पान मसाला व तंबाखू गुटखा मिळून आला तसेच १८,००,०००/- रू किमंतीचा आयशर टेम्पो असा एकूण ५२,९४,६४०/- रू किमंतीचा मुददेमाल मिळून आलेने सदरबाबत पोलीस कॉन्स्टेबल/७५४ कुलदीप पांडुरंग घोळवे, यांनी सरकार तर्फे फिर्याद देवून चालक नामे वैभव अशोक घायाळ वय २६ वर्षे रा. गवळवाडी ता. पाटोदा जि. बीड याचे विरूध्द जामखेड पोलीस स्टेशन येथे गु र नं. ५२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि नंदकुमार सोनवलकर हे करत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, प्रविणचंद्र लोखंडे, उपविभाग पोलीस अधिकारी कर्जत विभाग, किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली दशरथ चौधरी, पोलीस निरीक्षक, सपोनि/नंदकुमार सोनवलकर, पोसई/किशोर गावडे, पोकों कुलदीप पांडुरंग घोळवे, देवीदास पळसे, चालक महादेव मिसाळ, होमगार्ड संदिप चव्हाण यांचेसह मा. शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जि. बीड व पोलीस पथक यांनी केली आहे.
