अहिल्यानगर शहरात पान टप्प्यामध्ये गुटखा विक्री करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे छापे

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचेकडे अहिल्यानगर शहरामध्ये पान टपऱ्यामध्ये गुटखा विक्री होत असलेबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.त्यानुसार त्यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरातील पान टपऱ्यांची तपासणी करुन गुटखा विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिलेले होते.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरिक्षक अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार सुनिल पवार,राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले,गणेश धोत्रे, भिमराज खर्से,राहुल डोके,रिचर्ड गायकवाड,बाळासाहेब नागरगोजे यांचे पथक तयार करुन त्यांना अहिल्यानगर शहरातील पान टपऱ्यामध्ये गुटखा विक्री करणारे इसमांची माहिती घेत कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

पथकाने नुकतेच अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्री करणारे इसमांची माहिती काढुन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकुन खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम आरोपींचे नांव पत्ता जप्त मुद्देमाल १ तोफखाना ९७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ वगैरे

१) अल्तमश फयाज सय्यद रा. बेपारी मोहल्ला, सुभेदार गल्ली, झेंडीगेट अहिल्यानगर, (ग्लोबल पान शॉप तारकपुर) ३९६० रुपये किमतीचा गुटखा
२) भिंगार कॅम्प ५२०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ वगैरे 

१) समीर अब्दुल बागवान रा. रामचंद्र खुंट, अहिल्यानगर (बन्सी भाई पान शॉप टॉप अप पेट्रोलपंपासमोर)
२) समीर शाबीर शेख रा. अहिल्यानगर (फरार)
३) आतिक उर्फ आकीब मोहमंद शेख रा. भिंगार (फरार) ६१६० रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखु
३ कोतवाली /२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३ , २७४, २७५ वगैरे.

१) मुजाहिद अल्ताफ तांबोळी रा. झेंडीगेट चौक,अहिल्यानगर (अल्ताफ पान शॉप, आयुर्वेद कॉर्नर)
२) समीर शाबीर शेख रा. अहिल्यानगर (फरार)
३) आतिक उर्फ आकीब मोहमंद शेख रा. भिंगार (फरार) ७०१२ रुपये किमतीचा गुटखा
एकुण १७१३२ जप्त करण्यात आला.हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!