सरन्यायाधीश भूषण गवई,भ्याड हल्ल्याची बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निषेध सभा

Cityline Media
0
बारामती सिटीलाईन न्यूज नेटवर्क देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती येथे आयोजित मूक आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे सहभागी होवून त्यांनी उपस्थिती दर्शविली प्रसंगी आंदोलनानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. 
श्री गवई यांच्यावर झालेला हल्ला हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विरोध करण्याची जी नवी पध्दत देशात सुरू झाली आहे,ती चुकीची असल्याचे सांगितले. ही प्रवृत्ती वाढू नये यासाठी आपण समाज म्हणून चर्चा केली पाहिजे असे मत व्यक्त केले.आशा घटना रोखण्यासाठी काय करता येईल यासाठी पुढील अधिवेशनात संसदेत चर्चा व्हावी,अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणार कोणाच्या मनमानीने नाही असे ठामपणे सांगितले. तसेच सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला. 

याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे युगेंद्रश्रीनिवास पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. एस. एन. बापू जगताप,मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे,बारामती तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र बापू जगताप,सुभाष आप्पा ढोले,तालुका महिलाध्यक्षा वनिता बनकर, शहराध्यक्ष आरती गव्हाळे, युवकाध्यक्ष संदीप देवकाते, युवक शहराध्यक्ष बळीराम बेलदार,गौरव जाधव,पुणे जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष पैगंबर शेख,युवक लोकसभा अध्यक्ष प्रशांत बोरकर,युवती अध्यक्ष प्रियांका शेंडकर,युवती शहराध्यक्ष राणी नवले यांच्यासह संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!