पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी दिली बिरेवाडीतील भोसले कुटूंबास सांत्वन भेट

Cityline Media
0
आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती

झरेकाठी सोमनाथ डोळे‌ संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बिरेवाडी येथील बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले यांचे पुतणे श्रेयस तथा बालु संजय भोसले याचे दिपावली पाडव्याच्या दिवशी निधन झाल्याने भोसले कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.श्रेयस याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.श्रेयस याच्या निधनानंतर राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांनी भोसले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्व.श्रेयश याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मंत्री विखे व आमदार खताळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रेयस अत्यंत कमी वयात निधन झाल्याने मंत्री विखे पाटील यांनी दुःख व्यक्त करत भोसले कुटुंबियांना धीर दिला.तसेच बाबासाहेब भोसले यांच्याशी मंत्री ना. विखे पाटील यांनी चर्चा केली.

यावेळी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर,भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख,ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर,शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे,भाजपा बुथ प्रमुख सोमनाथ डोळे,हरिभाऊ गिते, संदिप खिलारी आदिंसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!