श्रीरामपुरात आरोग्य मुक्तीची प्रार्थना सभा उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहरालगत शासकीय आदिवासी वस्तीगृहासमोर,कागद कारखाना शेजारी, हरेगाव रोड येथील लोकसेवा सर्व पंथीय प्रार्थना भवन ट्रस्ट,येशु का दरबार याठिकाणी एकदिवसीय प्रार्थना सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून ३:०० वाजेपर्यंत प्रभू येशुचे अभिषिक्त सेवक पा.विकास दास (आग्रा) यांची प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती.या प्रार्थना सभेत पा.प्रशांत चक्रनारायण (चर्च कमिटी व महिला मंडळ, तरूण संघ अहिल्यानगर) तसेच 
प्रार्थना सहयोग म्हणून अहिल्यानगर ड्रिस्टिक्ट रेव्ह. ॲण्ड पास्टर्स असोसिएशनचे बिशेप शमुवेल भिंगारदिवे यांची उपस्थिती होती.

या एकदिवसीय प्रार्थना सभेसाठी रेव्ह.सदाशिव चव्हाण, पा.शाहरूख पठाण,पा.पाॅल बनकर, राहता फेडरेशनचे अध्यक्ष पास्टर विलास कांबळे, पास्टर संतोष वाघमारे, शिर्डी येथील पास्टर धिवर , पास्टर पेटारे, त्याचबरोबर प्रार्थना सभेसाठी लोकसेवा प्रार्थना भवन नगर येथील सभासद आकाश भाकरे, विश्वास थोरात, प्रदिप आल्हाट, सिस्टर अंबिका ढाकणे, सिस्टर प्राजक्ता चक्रनारायण यांची उपस्थिती होती.सदरील प्रार्थना सभेचे आयोजन ब्रदर विलास पठारे, सिस्टर महिमा हिवाळे, ब्रदर दिपक कदम, ब्रदर प्रकाश कदम यांनी केले होते.

सदरच्या प्रार्थना सभेत प्रभू येशू खरी ओळख या दृष्टीकोनातून "चला, आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू."  या परमेश्वराचा शब्द किती महान आहे हे सर्वांना पटवून देण्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जिल्ह्यातील तालुक्यातील व परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने भक्तीभावाने उपस्थित राहून परमेश्वराचा आशिर्वाद त्यांनी घेतला.त्याचबरोबर सर्वांना महाप्रसाद मनमुराद आनंद लुटला.

सर्व ख्रिस्ती भाविकांच्या मागणीनुसार महिन्याच्या दुसरा व चौथा शनिवारी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत प्रार्थना सभेचे आयोजन करावे अशी मागणी होती.ती मागणी पूर्ण करण्यात आली.यापुढे दर महिन्याला दुसरा व चौथा शनिवारी प्रार्थना सभा राहील.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!