अमळनेर येथे 'श्रावण बाळ सेवा पुरस्कार' व ३५० गुणवंत विद्याथ्यांचा गौरव
अमळनेर सिटीलाईन न्यूज नेटवर्क आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे,असे प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले यांनी अमळनेर येथे केले.
श्री.वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान आणि डॉ. सौ.माधुरी मनोहर भांडारकर बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'श्रवण बाळ सेवा पुरस्कार' व गुणवंत विद्याथी बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पोलिस उपअधिक्षक देसले यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्पर्धा परीक्षांद्वारे उच्च ध्येय गाठण्याचा सल्ला दिला.
पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनीही विद्यार्थ्यांना ध्येय मोठे ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सुमित कॉम्प्युटर्स तर्फे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या 'एआय' ॲप्सचे लोकार्पण करण्यात आले.बाजार समिती संचालिका सुषमाताई देसले, मा.नगराध्यक्ष सुभाष चौधरी,संचालक संजय शुक्ल, हेमंत भांडारकर, निवृत्त प्रा.डॉ.पी. जे.जोशी आणि जयेशकुमार काटे
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री, बहादरपूर, रत्नापिंप्री,राजवड येथील दहावी-बारावीमध्ये ८५% हून अधिक गुण मिळवलेल्या सुमारे साडेतीनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला. तसेच, शासकीय सेवेत निवड झालेल्या शुभम पाटील, धीरज पाटील, निलेश पाटील, प्रशांत पाटील, मोहम्मद उसेद शकील काझी, उदय सोनार, कविता बिन्हाडे, गौरव भोईटे या युवा अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
वासुदेव देसले (दहिवद) व रमेश चौधरी (कळमसरे) यांच्या दातृत्वाने विद्यार्थ्यांना फाइल्सचे वाटप झाले. सुसंस्कृत कुटुंबाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा 'श्रावण बाळ सेवा पुरस्कार' यावर्षी पत्रकार बंधू जयेशकुमार काटे व उमेश काटे यांच्यासह रमेश बुधा शिरसाट, रहेमतुल्ला बैतुल्ला पिंजारी, शशिकांत दत्तात्रेय चौधरी,चेतन महाजन, प्रशांत मनोहर वाणी, भरतसिंग परदेशी, रमेश चिंधा चौधरी, ॲड तिलोत्तमा पाटील, रवींद्र सोमा महाजन अशा व्यक्तींना सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष चौधरी यांनी केले, तर आत्माराम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शांतीलाल रायसोनी,रामराव पवार, राजेंद्र देसले,राजू फाफोरेकर, जितेंद्र पाटील, भिकनराव पाटील,अनिल काटे आदीसह अनेक नागरिक उपस्थित होते.
