संगमनेर प्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून धनगर व बंजारा समाजाने केलेल्या आरक्षण मागणी मुळे आदिवासी समाजात पुन्हा संभ्रमाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.खोट सांगून गैरसमज पसरवून तरुणांना भडकले जात आहेत.या संदर्भात जनतेचे प्रबोधन व्हावे.आरक्षणाचे सत्य समोर यावे.सत्ताधाऱ्यांनी समाजात लावलेले संघर्ष थांबावेत, समाजातील सलोखा कायम रहावा. आणि आरक्षणाचे तत्व अबाधित रहावे. या करिता, प्रांताधिकारी कार्यालय,संगमनेर वर दिनांक १ नोव्हेंबर२०२५ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
नुकतेच साथी भास्करराव दुर्वेनाना प्रतिष्ठान,सभागृह संगमनेर,येथे झालेल्या आदिवासी कार्यकर्त्यांच्या बैठकी मध्ये जाहीर करण्यात आले. याबाबत मोर्चाचे निवेदन शहर पोलिस ठाण्यास सादर करण्यात आले.मोर्चाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकानाच्या वतीने करण्यात आले.
प्रसंगी बैठकीला चेतन कांबळे,राजू शिंगाडे,रवींद्र मेंगाळ ,अतुल कवटे,चंद्रकांत आहेर,मुकेश पवार,कैलास बुळे, बाळकृष्ण गांडाळ,तुकाराम कोरडे,अनिल बर्डे, संतोष बर्डे, रोहिदास जंगले, प्रतीक पोपेरे, राजेंद्र जाधव,हिरामण भुतांबरे, संकेत कोरडे, तुषार कचरे, वैभव डगळे ,सोमनाथ केदार,सोमनाथ केदार,शरद मोरे, गणेश आहेर, नवनाथ केदार, सुखदेव भुतांबरे, गंगाराम वाघ, खेमा वाघ, सुरेश बर्डे, किरण शिंदे, राजेंद्र गंभीर, अजय मोरे, विकास पवार, गोकुळ माळी,डॉ जालिंदर घिगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
