आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील मांची हिल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, येथे कोजागिरी पौर्णिमा सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर२ ०२५ रोजी दमा (अस्थमा) तपासणी व औषधोपचार शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या अमृतमय प्रकाशात गोरक्षनाथांनी सिद्ध केलेले विशेष आयुर्वेदिक औषधोपचार यावेळी रुग्णांना मोफत दिले जाणार आहेत.शिबिरातील विशेष सेवा व वेळ
कोजागिरी पौर्णिमा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
याच पौर्णिमेच्या मुहूर्तावर आयुर्वेद परंपरेतील अमृत योगाचा लाभ घेऊन दमा व श्वासनाचे विकार कायमस्वरूपी बरे करण्याची संधी रुग्णांना मिळणार आहे.सेवा: दमा (अस्थमा), वारंवार होणारी सर्दी, पोस्ट कोविड झालेले रुग्ण आणि बाल दमा यांसारख्या व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत असेल.
वेळ: शिबिर सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०४:०० ते रात्री १२:०० पर्यंत चालणार आहे.
उपवास: दमा असणाऱ्या सर्व रुग्णांनी शिबिराच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करून उपस्थित राहावे.
इतर: १२ वर्षांखालील रुग्णांसाठी उपवासाची अट नाही. तसेच, इतर आजारांची तपासणी व प्राथमिक उपचारही मोफत केले जातील.
ह.भ.प. भूषण महाराज खांडे यांचे प्रवचन
या आरोग्य शिबिरासोबतच नागपूर येथील ह.भ.प. भूषण महाराज खांडे यांच्या प्रवचनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हे प्रवचन रात्री ८ ते १० या वेळेत होणार आहे. आध्यात्मिक आणि आरोग्यविषयक विचारांची ही पर्वणी असेल.
संपर्क आणि नोंदणीसाठी रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व व्याधींपासून कायमची मुक्ती मिळवावी,असे आवाहन अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे शिबिरात सहभागी होण्यासाठी रुग्णांनी आपली नाव नोंदणी आगाऊ अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, मांचीहिल, आश्वी बु., ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे तसेच अधिक माहितीसाठी खालील संयोजकांच्या नंबर वर संपर्क करा प्रवीण कडू (९९२२७०९९१९),. राहुल पठाडे ९६७९७२९६००. रोहित तांबे ९५७९९७२००७, डॉ. शुक्राचार्य वाघमोडे ७६२०५६५३९९
