पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एक पेड मेरी माँ के नाम हा उपक्रम स्तुत्य-आमदार खताळ

Cityline Media
0
स्वामी नरेंद्राचार्य महाराज वसुंधरादिंडीचे  आमदार खताळ यांनी वृक्षारोपण करून केले स्वागत

संगमनेर संपत भोसले कौलाघात या कॉक्रीटच्या जंगलात आपण कुठेतरी निसर्गापासून दुर चाललो मोठ्या प्रमाणात  वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा होणारा -हास थांबविण्यासाठी नाणीजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी सुरू केलेला" एक पेड माँ के नाम ' हा अभिनव उपक्रम  निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीज धामला २१ऑक्टोबर ०२५ रोजी  जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा जन्मसोहळा होत आहे.त्या निमित्त उत्तर महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्त सहभागी असलेली वसुंधरा पायी दिंडीचे २९ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ  येथून प्रस्थान झाले आहे.

ही दिंडी उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आली असता आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांनी या दिंडीचे संगमनेर शहरात उत्स्फूर्त स्वागत केले.तसेच चंदनापुरी येथील सिंधू लॉन्स येथे आमदार अमोल खताळ यांनी  जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या सिद्धपादुकाचे दर्शन घेतले त्यांच्या हस्ते व उत्तर अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे दिंडी प्रशासन प्रमुख सुभाष सानप ,उत्तर नगर जिल्हा निरीक्षक दादासाहेब मते उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे संगमनेर तालुकाध्यक्ष प्रकाश बेलापूरकर  राजशिष्टाचार प्रमुख व्यंकटेश बप्पा यांच्या सह अनेक भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या भक्तांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की एक पेड माँ के नाम ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती जगद्गुरु रामा नंदाचार्य नरेंद्राचार्य भक्तगणांनी पर्यावरणाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी वसुंधरा पायी दिंडी हा उपक्रम सुरू केला आहे.तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे.

स्वामी नरेंद्रा चार्य महाराज यांचा तुमच्या आमच्यावर कृपाशीर्वाद आहे.त्यांनी व त्यांच्या भाविक भक्तांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम सुरू केले आहे त्याचेच फळ विधानसभा  निवडणुकीत मिळाले आहे. आणि माझ्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी या संप्रदायातील भाविक भक्तांमुळे मिळाली आहे.

या वृक्षदिंडीमध्ये लहानांपासून ज्येष्ठापर्यत आणि महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वच जण भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहे. मात्र या दिंडीमध्ये महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात  दिसून येत आहे नारीशक्तीच्या माध्यमातून देशाची व धर्माची यशस्वी वाटचाल  सुरू असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

-पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी महत्वाचा उपक्रम सौ.निलम खताळ
नाशिक उपपिठाहुन नाणीजधाम येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जन्म सोहळा निमित्त जात असणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांनी स्वागत केले  त्यांनी  झाडे लावा झाडे जगवा... पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा हा संदेश या वृक्षदिंडीच्या  माध्यमातून पोहोचून पर्यावरण जागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तो निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास सौ.नीलम खताळ यांनी व्यक्त केला
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!