श्रीरामपूर दिपक कदम येथील डी पॉल पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई येथे २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टो.२०२५
श्रीरामपूर शहरामध्ये पहिल्यांदाच मुख्य परीक्षक संदीप पांढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सुरू आहे. आयोजक मुख्य प्रशिक्षक तायक्वांदो कोच विजय लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.
शिबिरामध्ये तलवार बाजी,लाठी काठी, दांड पट्टा, सुरूळ (ऊर्मी), भाला आणि इतर शिवकालीन शस्त्र इ.प्रकाराच्या प्रशिक्षणामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन धाडस, साहस, वीरता, आत्मविश्वास व स्वसंरक्षण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी आणि भारतीय संस्कृती जपणारी कला आणि आत्मसंरक्षण वाढवण्यासाठी ही कला उपजात आहे.
डी पॉल पब्लिक स्कूल संस्थेचे व्यवस्थापक फादर शिजो, प्रशासक फादर फ्रँको, प्राचार्या सिस्टर ब्लेसा, समन्वयक सिस्टर रेन्नी, सचिव मॉली कुथूर, वरिष्ठ लिपीक रविंद्र लोंढे, श्री. पवार ,खेळ स्पर्धा प्रमुख सोनाली झांजरी तसेच किडा प्रशिक्षक संदीप निबे,संदीप जाधव यांच्या मोलाच्या सहकार्याने शिवकालीन मर्दानी खेळ आणि तायक्वांदो प्रशिक्षण उत्साहात पार पडत आहे.
