माणिकगिरी महाराज फिरत्या नारळी सप्ताहाचे महंत दत्तगिरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Cityline Media
0
दाढ खुर्द येथे मंगळवार २५  ते २ डिसेंबर दरम्यान हरिनाम सप्ताहाचे आयोजन. 

झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे सद्गुरु माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरत्या १९ व्या नारळी सप्ताहाचे मंगळवार दि. २५  ते मंगळवार २ डिसेंबर दरम्यान वरंवडी येथील रामेश्वर व उबरेश्वर मठाचे महंत हभप दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दाढ खुर्द पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले असून सप्ताहस्थळी .बुधवारी महंत दत्तगिरी महाराज याच्या हस्तें ध्वजारोहण करण्यात आले.
दाढ खुर्द येथील  फाटा परिसरात १५ एकर क्षेत्रावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण दिनी हाती भगवे ध्वज,टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत भावभक्ती पूर्वक दाढ खुर्द  ग्रामस्थानी सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.२५ फूट उंचीच्या खांबावर याठिकाणी वारकरी संप्रदायाची पताका उभारली गेली आहे. याप्रसंगी मंगलमय वातावरणात महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्तें व दाढ खुर्द व पंचक्रोशीतील.ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवतपणे ध्वजारोहण करण्यात आले.

दरम्यान या सप्ताहकाळात नामवंत किर्तनकार आपली सेवा देणार असून व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे, मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पद्मश्री कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय  विखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनी विखे आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आदी सह सप्ताहासाठी सहकार्य करण्यात असल्याचे सांगण्यात आले.

जनसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी विकास मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या नारळी सप्ताह साठी तन-मंधनाने सेवा करणार असल्याचे निदर्शनात आले. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यास्दातव दाढ खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थानी सप्ताहस्थळी जोरदार तयारी केली आहे.गावातील तरुण तसेच ग्रामस्थं यामध्ये सहभागी झाल्याने गावात मंगलमय सण-उत्संवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचक्रोशीतील भाविकानी या सप्ताह सोहळ्यासाठी आठ ही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महंत दत्तगिरी महाराज व दाढ खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थानी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!