दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार,सुनील अशोक गांगुर्डे (वय ३२), रमेश भीमराव खरे (वय ३५, रा.महादेववाडी, महालक्ष्मी चौक) हे घरी येत असताना,सातपूर कॉलनीतील श्रीराम चौकाजवळ अपघात झाला.घटनेनंतर नागरिक व नातेवाईक यांनी दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना समजताच नातेवाईक, मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.सुनील गांगुर्डे हा बसपाचे जिल्हाध्यक्ष अरुण काळे यांचा भाचा होता.पोलीस हवालदार आबाजी मुसळे पुढील तपास करत आहे.
3/related/default
