नाशिक दिनकर गायकवाड रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र मोटार सायकल वरील चोरट्याने बळजबरीने खेचून नेल्याची घटना घडली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
फिर्यादी मंदा भोरू शिंदे (रा. प्रशांतनगर, नाशिक) या प्रशांतनगर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरासमोरील रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी समोरून एका मोटार सायकल वरून आलेल्या हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने शिंदे यांच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाचे ९२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने खेचून चोरून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोनसाखळीचा गुन्हा तर दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार आव्हाड करीत आहेत.
