नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबकेश्वर येथी दोबाड वाडी वस्तीच्या वरच्या बाजूला असलेल्या धरणाच्या जवळ ओहळात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
एकूण परिस्थिती पाहता हा घातपाताचा संशय असल्याचे व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोलदरा धरणाच्या बाजूला असलेल्या ओहळात पुरुष जातीचे साधरणतः ४५ वर्षांचा इसम मयत अवस्थेत पडलेला असल्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती मिळाली.
प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गावित, हवालदार सचिन जाधव, बोराडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्राथमिक अंदाजावरून सदर इसम चार ते पाच दिवसांपूव मयत झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मृतदेह पोस्टमार्टमसाठी नाशिक येथे पाठवण्यात आले आहे.
