श्रीरामपूर दिपक कदम महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आयोजित जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा राहाता तालुक्यातील सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडी, ठिकाणी नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री.जगदंबा प्रासादिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून श्रीरामपूर तालुक्याचे नेतृत्व केले. जिल्हास्तरावर विजयी होऊन विभागासाठी हा संघ पात्र ठरला अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक के.ए.जाधव व पर्यवेक्षक आर.एम.आदमाने यांनी दिली.
या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संघाने अंतिम सामन्यात त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा या विद्यालयातील संघाविरुद्ध ३२ - २८ च्या फरकाने पंचांच्या निर्णयाने सामना जिंकला,असे जाहीर करण्यात आले.
सर्व खेळाडूंचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष मा. रा. ह. दरे साहेब, उपाध्यक्ष मा.डॉ. विवेक भापकर,सचिव ॲड.विश्वासराव आठरे सहसचिव मुकेश मुळे , खजिनदार मा.ॲड.दीपलक्ष्मी म्हसे, सिताराम खिलारी व संस्थेच्या सर्व विश्वस्त व सदस्यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव के.ए.पर्यवेक्षक आदमाने आर.एम.क्रीडा प्रमुख.शिंदे एस. एस.मार्गदर्शक शिक्षक श्री.लोखंडे, रुपटक्के ए. एस. सकट एस. व्ही. आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय व्यवस्थापन समिती तसेच .भाऊराव सुडके, गणेश पवार,युवराज सुडके जगदंबा स्पोर्ट क्लब भोकर आदींचे अनमोल मार्गदर्शन मार्गदर्शन लाभले.
